श्री. रविंद्र निंबाळकर, मो. नं. 9850718677
पहिल्या दिवशी आल्यानंतर इथे जे सेवेकरी आहे, त्यांनी खूप छान गाईड केले. येथे भेटणारे जे शिवाम्बू चिकित्सा आहे, ते जे ज्ञान आहे ते खूप छान आहे. त्यांचा अनुभव घेतला. या पाच दिवसात माझं आरोग्य छान झालं. मला आनंदी वाटत आहे. मी माझ्या शरीराला चांगल्या सवयी लावू शकलो. मी जे रोज धुम्रपान करत होतो, ते ही या पाच दिवसात बंद झाले आहे. येथून पुढे मी ते बंद करणार. भूगर्भ चिकित्सा, मड बाथ यामधून मला नवचैतन्य भेटले. मालिशने माझं अंग हलके झाले. शिवाम्बू चिकित्सेचा ज्यांनी पण शोध लावला त्यांना धन्यवाद. तसेच या शिवीराचे प्रशिक्षक डॉक्टर्स ज्यांनी त्याचा प्रसार केला, त्याबद्दल धन्यवाद. याचा जगात असाच प्रसार होईल, ही अपेक्षा.
डॉ. साहेब आपलं संभाषण खूप छान आहे. आश्रमामध्ये आल्यामुळे खूप आनंद झाला आहे. या विचारांच्या प्रवाहात आपणही प्रवाहीत व्हायला हवं, असं मलाही आज वाटत आहे.